Overthinking थांबत नाहीये? ❤️ | एक Practical Emotional Healing Workbook
About Course
Overthinking थांबत नाहीये? ❤️
एक Practical Emotional Healing Workbook
कधी कधी एखादा छोटासा विचार मनात येतो… आणि त्याच विचारांची एक पूर्ण chain सुरू होते.
“हे असं का झालं?”
“पुढे काय होईल?”
“मी काही चुकीचं तर केलं नाही ना?”
“जर असं झालं तर?”
“सगळं माझ्या control मध्ये असायला हवं…”
अशा विचारांमध्ये आपण इतके अडकून जातो की वर्तमान क्षणापेक्षा मनात चालणाऱ्या गोष्टी जास्त मोठ्या वाटू लागतात. सतत विचार करणं, प्रत्येक गोष्टीचं analysis करणं आणि प्रत्येक परिस्थितीचं उत्तर लगेच शोधण्याचा प्रयत्न करणं emotionally exhausting होऊ शकतं.
Overthinking थांबत नाहीये? ❤️एक Practical Emotional Healing Workbook
हे तुमचे विचार जबरदस्तीने थांबवण्यासाठी तयार केलेले नाही. कारण healing म्हणजे विचार कधीच येणार नाहीत असं नाही. Healing म्हणजे प्रत्येक विचारावर लगेच विश्वास न ठेवता, तो observe करणं, त्यामागचा pattern समजून घेणं आणि पुन्हा स्वतःकडे परत येण्याचा सराव करणं.
या workbook मध्ये तुम्हाला तुमच्या overthinking patterns कडे अधिक जागरूकपणे पाहण्यासाठी practical reflection आणि healing exercises दिले आहेत. तुमच्या मनात येणारा विचार Fact आहे की Assumption, तुमच्या control मध्ये काय आहे आणि काय नाही, हे वेगळं पाहण्याचा सराव तुम्ही करू शकता.
यासोबतच EFT आणि इतर practical healing practices च्या माध्यमातून difficult emotional moments मध्ये स्वतःसोबत थोडं थांबणं, स्वतःला observe करणं आणि एक छोटं पुढचं पाऊल घेण्याचा सराव करता येतो.
या Workbook मधून तुम्ही काय explore कराल?
♡ तुमचे recurring thought patterns ओळखणे
♡ Overthinking सुरू झाल्यावर स्वतःला pause देणे
♡ Thought, Fact आणि Assumption यामधला फरक पाहणे
♡ तुमच्या control मध्ये काय आहे आणि काय नाही हे समजून घेणे
♡ स्वतःच्या emotions कडे अधिक awareness ने पाहणे
♡ EFT सारख्या practical healing practices चा वापर करून पाहणे
♡ मोठ्या problem ऐवजी One Small Action घेण्याचा सराव करणे
♡ स्वतःला प्रत्येक गोष्ट लगेच solve करण्याची गरज नाही, हे स्वीकारण्याचा सराव करणे
लक्षात ठेवा:
“माझ्या मनात विचार आला आहे, म्हणजे तो नक्कीच सत्य आहे असं नाही.”
आणि,
“मला सगळं आत्ताच solve करण्याची गरज नाही.”
हा workbook तुमच्यासोबत एक छोटासा pause घेण्यासाठी, तुमच्या मनाकडे curiosity ने पाहण्यासाठी आणि स्वतःला थोडी अधिक space देण्यासाठी आहे.
Heal. Grow. Thrive. ♡
हे Workbook educational आणि complementary emotional-wellness purposes साठी तयार करण्यात आले आहे. यातील EFT, reflection exercises आणि इतर practices या medical diagnosis, medical treatment किंवा professional mental-health care चा पर्याय नाहीत.
Course Content
Practical Workbook
-
Overthinking थांबत नाहीये?